सोलापूर- जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्डी येथील यमाई देवीच्या मंदिरात मोठी चोरी झाली आहे. मंदिरातील 40 किलो चांदी आणि 60 ग्रॅम सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. मंदिरातील चोरीमुळे पोलीस प्रशासनाकडून श्वान पथक आणि ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले असून चोरांच्या माग काढण्यात येत आहे.
मार्डीच्या यमाई मंदिरातील दागिन्यांवर चोरांचा डल्ला; जाताना साडीने झाकले देवीचे मुख
मार्डी येथे झालेल्या यमाई देवीच्या मंदिरात झालेल्या चोरीत 60 ग्रॅम सोने, चाळीस किलो चांदी तसेच दानपेटीतील अडीच लाख रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
यमाई मंदिर
दरम्यान, मार्डी येथे झालेल्या यमाई देवीच्या मंदिरात झालेल्या चोरीत 60 ग्रॅम सोने, चाळीस किलो चांदी तसेच दानपेटीतील अडीच लाख रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज असून यात चोरांनी देवीचे मंगळसूत्र, अंगावरील दागिने आणि वस्त्रांचीही चोरी केली आहे. चोरी करून जाताना चोरांनी देवीच्या मुखावर साडी पांघरल्याचेही आढळून आले. तुळजापूरच्या दर्शनानंतर मार्डीच्या यमाई देवीचा मान आहे.