पंढरपूर- अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या जीपने दुचाकीवरुन जााणाऱ्य़ा पती-पत्नीस जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात पत्नी जयश्री बारले यांचा जागीच मृत्यू झाला असून पती प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकाश यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकी साठ फुटापर्यंत फरपटत गेली होती. अपघातानंतर जीपचालक फरार झाला आहे.
वाळू माफियांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर-
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात अवैधरित्या वाळू माफियाकडून वाळू उपसा करण्यात येते. वाळू उपसा केल्यानंतर बिना नंबर प्लेटचे जीप चंद्रभागा नदी पुलावरून भरधाव वेगाने नेले जातात. पंढपूरमधील नागरिक सकाळी फिरण्यासाठी सोलापूर व पंढरपूरला जोडणाऱ्या या पुलावरून 65 एकर मैदानावर जातात. त्यामुळे पहाटेच्या वेळी या पुलावर नागरिकांची गर्दी असते. परिणामी पुलावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातानंतर वाळू माफियांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.