महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगळवेढा तालुक्यात वाळू माफियांवर कारवाई; 4 बोटी नष्ट, 50 ब्रास वाळू जप्त - Sand Mafia Action Mangalvedha

मंगळवेढा तालुक्यातील माण नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या 4 बोटी जिलेटिन स्फोटकाच्या साहायाने उडवण्यात आल्या. तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा महसूल विभागाकडून काल ही कारवाई करण्यात आली.

Mangalvedha taluka sand excavation
मंगळवेढा तालुक्यात वाळू माफियांवर कारवाई

By

Published : Jan 2, 2021, 8:41 PM IST

सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील माण नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या 4 बोटी जिलेटिन स्फोटकाच्या साहायाने उडवण्यात आल्या. तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा महसूल विभागाकडून काल ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांना मोठा दणका बसला आहे.

हेही वाचा -बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करणाऱ्यावर कारवाई

महसूल विभागाकडून 50 ब्रास वाळू जप्त

तहसीलदार स्वप्नील रावडे व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत नदी काठावरील 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा अंदाजे 50 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. तसेच, वाळू माफीयांच्या 4 बोटी महसूल प्रशासनाने नष्ट केल्या. यामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मान नदीपात्रात वाळू माफियांचा धुमाकूळ

गेल्या काही महिन्यांपासून माण नदी क्षेत्रात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून, नदीपात्राची चाळण केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेली वाहने कारखाना महामार्गावरून जात-येत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. नदीपात्रात दिवस-रात्र बोटींद्वारे वाळू उपसा सुरू होता. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला. महसूल विभागाकडून अनेकदा कारवाई करण्यात येते. मात्र, या मध्ये सातत्य नसल्याने काही दिवसांनी पून्हा वाळू उपसा होतो.

हेही वाचा -बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करणाऱ्यावर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details