पंढरपूर (सोलापूर) -रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून पंढरपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दूध आणि बेदण्याचा अभिषेक घालण्यात आला. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा असल्यामुळे मंगळवारी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक - sadabhau khot demand to mva government
तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दूध आणि बेदाण्याचा अभिषेक घालून सरकारचा निषेध केला.
तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दूध आणि बेदाण्याचा अभिषेक घालून सरकारचा निषेध केला. रयत शेतकरी संघटनेकडून प्रमुख मागण्यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतीपंपाचे वीज बील माफ करावे, दुधाला लिटरला तीस रुपये दर आणि बेदाण्याला दोनशे रूपये किलो भाव मिळावा, बोगस सोयाबीन बियाणांमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, कंद्याला 500 रूपये दर द्यावा. तसेच खासगी सावकार, बँक, फायनान्स यांच्या सक्तीच्या वसूली बंद कराव्यात.
मंगळवेढा तालुक्यातील नांदुर गावातील युवा शेतकऱ्यांने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूधदर वाढीविषयी स्वताच्या रक्ताने पत्र लिहून आपले दुःख व्यक्त केले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.