महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 22, 2020, 4:09 PM IST

Updated : Oct 22, 2020, 5:49 PM IST

ETV Bharat / state

रयत क्रांती संघटनेचे शेतकऱ्यांसाठी जागरण गोंधळ आंदोलन

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोेठे नुकसान झाले. यामुळे विविध मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन केले.

आंदोलक
आंदोलक

सोलापूर- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्णपणे असमानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. या विरोधात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने गुरुवारी (दि. 22 ऑक्टोबर) दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करण्यात आले.

बोलताना दीपक भोसले

शेतकऱ्यांची सर्व शेती माल व पिके अतिवृष्टीत उद्ध्वस्त झाले आहे. गेल्या वर्षीचा परतीचा पाऊस त्यानंतर कोरोना महामारी आणि नुकतीच झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्व पिके व शेतीमालाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (गुरुवार) दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

  • या आहेत प्रमुख मागण्या
  1. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे.
  2. जिरायत भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार व बागायती शेतजमीनिला प्रति हेक्टर 1 लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.
  3. शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीजबिल माफ करावे.
  4. पुरात शेतजमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मिळावे.
Last Updated : Oct 22, 2020, 5:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details