सोलापूर - दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे सोलापुरात पडसाद उमटले आहेत. आज गुरुवारी शहरात सकाळी गेंट्याल चौक येथे सिटू, डीवायएफआय, एसएफआय, जनवादी महिला संघटनांच्यावतीने 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या विविध संघटनांच्यावतीने माजी आमदार नरसय्या आडम आणि 'सिटू'चे महासचिव एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा-
दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता हे आंदोलन करण्यात आले. गेंट्याल चौक परिसरात सकाळपासूनच कामगारांचे जथे यायला सुरुवात झाली होती. नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर, नासीमा शेख आदी माकपचे नेते गनिमी काव्याने एका बाजूला कार्यकर्ते गोळा करताना दिसले, तर दुसऱ्या बाजूला पोलीस हे आंदोलन उधळून टाकण्याच्या तयारीत होते.
शेतकरी आणि कामगार कायदे मागे घ्या-