महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करमाळ्यात पक्ष बदलाची नव्हे तर, व्यक्ती बदलाची गरज - रश्मी बागल

करमाळा विधानसभा निवडणूक ही चुरशीची होत असताना शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांना डावलून नुकतेच राष्ट्रवादीतुन शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारीं मिळाली आहे.

रश्मी बागल

By

Published : Oct 9, 2019, 10:28 AM IST

सोलापूर - करमाळा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांनी प्रचाराला सुरुवात केली असून पक्ष बदलाची गरज नसून व्यक्ती बदलाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया रश्मी बागल यांनी दिली आहे.

रश्मी बागल

हेही वाचा - शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही

करमाळा विधानसभा निवडणूक ही चुरशीची होत असताना शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांना डावलून नुकतेच राष्ट्रवादीतुन शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी मिळाली आहे. माझ्या प्रचाराला शेतकऱ्यांचा व तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे रश्मी बागल यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details