सोलापूर - माढ्याचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदेंचा नाही, तर खुद्द शरद पवार आणि विधानपरिषद सभापती रामराजे नाईक - निंबाळकरांचा आहे, असे भाजपचे विजयी उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी म्हटले आहे.
माढ्यातल्या राष्ट्रवादीच्या पराभवाचे धनी शरद पवार अन् रामराजेच - रणजितसिंह निंबाळकर - राष्ट्रवादी
माढ्यात राष्ट्रवादीचा किल्ला ढासळला असून त्याठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे.
माढ्यात राष्ट्रवादीचा किल्ला ढासळला असून त्याठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख होती. त्यामुळे हा पराभव पवारांचा आहे, असेही ते यावेळी म्हणाले. तर दुसरीकडे मोहिते-पाटील विरोधात राजकारण करणाऱ्या संजय शिंदे यांनी या निवडणुकीत प्रचारादरम्यान मोहिते-पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. मोहिते पाटील हे राजकारणातले कल्हई केलेले भांडे असून त्यांच्या माळशिरस मतदारसंघातून लाखांचे मताधिक्य मिळाले तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे ते म्हणाले होते. त्यावर आता निवडणुकीनंतर मोहिते पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना १ लाखांचे मताधिक्य दिले. त्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोचरी टीका करताना, शिंदे यांनी आता आगामी विधानसभा करमाळ्यातून लढवावी, असे प्रतिआव्हान दिले आहे.
त्याचवेळी संजय शिंदे यांनी करमाळ्यातून निवडणूक लढल्यास त्यांचा २५ हजार मतांनी पराभूत करू, असा विश्वास करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संजय शिंदे यांचा सर्व पातळीवर पराभव करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. त्याची पहिली झलक माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाली.