सोलापूर - आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात असणाऱ्यांनी सत्तेची वाटणी करून घेतली आहे. राष्ट्रवादीचा बिमोड करण्यासाठी आज सर्वजण एकत्र आलेले आहेत. माझी लढाई बारामतीकरांबरोबर असून संजय शिंदे यांना आपण मोजत नाही, असे प्रतिपादन भाजप-शिवसेना महाआघाडीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. ते करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सभेत बोलत होते.
माझी लढाई बारामतीकरांशी, संजय शिंदे यांना आपण मोजत नाही - रणजितसिंह नाईक निंबाळकर - ncp
पराभवाच्या भीतीने पवार यांनी पळ काढला व पर्यायी उमेदवार म्हणून शिंदे यांना उभे केले. आम्ही सर्व सहकारी एकत्रच आहोत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पराभवाच्या भीतीने पवार यांनी पळ काढला व पर्यायी उमेदवार म्हणून शिंदे यांना उभे केले. आम्ही सर्व सहकारी एकत्रच आहोत. आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे, शहाजीबापू पाटील, प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे हे सर्व जण माझ्या प्रचारात सक्रिय आहेत. हा भाग मागील २५ वर्षांपासून दुष्काळी आहे. इथे सत्ता राष्ट्रवादीकडेच होती. पण यांना या भागातील दुष्काळ हटवला नाही. दुष्काळी भागात खासदार असताना पवार कुठेच दिसले नाहीत. या भागातून चांगला प्रतिसाद आहे. व आपणच खासदार म्हणून निवडून येणार असेही ते म्हणाले.
आमदार पाटील म्हणाले की, आमदारकीच्या काळात तालुक्याचा चेहरामोहरा बदलला. हीच मंडळी आधी विरोध करत होती पण तीच आज शिंदेचे गोडवे गात आहेत. तालुक्यातील आदिनाथ, मकाई, कमलाई या साखर कारखान्याच्या गाळप झालेल्या उसाचे बिले अद्याप शेतकऱ्यांना वेळेवर दिलेली नाहीत. यापासून सावध राहावे, असे ते म्हणाले.