सोलापूर- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात शेडको शिवसैनिकांकडून राणे यांचा विविध प्रकारे आंदोलन करून निषेध व्यक्त केला जात आहे. आता राणे समर्थकही आक्रमक होत आहेत. मंगळवारी (दि. 24 ऑगस्ट) जशास तसे उत्तर देण्यास आम्हीही खंबीर आहोत, असा इशारा राणे समर्थकांनी शिवसेनेला दिला आहे.
आम्ही नारायण राणेंच्या आदेशाची वाट पाहतोय
नारायण राणेंनी जे वक्तव्य केले आहे, ते फक्त राजकीय वक्तव्य आहे. त्याचा शिवसेनेच्या नेत्यांनी बाऊ केला आहे. यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांनी अनेकवेळा भाजपवर व नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदींना चोर देखील म्हटले आहे. तर यावर भाजपच्या नेत्यांनी असे बाऊ करून निषेध आंदोलन, रास्ता रोको केला नाही. ही राजकिय स्टंटबाजी बंद करावी. अन्यथा आम्हालाही आक्रमक व्हावे लागेल, असा इशारा राणे समर्थकांनी दिला आहे. आम्ही नारायण राणेंच्या आदेशाची वाट पाहतोय ,आदेश आल्यावर आम्ही देखील रस्त्यावर उतरू, असेही म्हटले आहे.
हेही वाचा -सोलापूर: नारायण राणेंचा शिवसेनेच्या युवा सैनिकांकडून निषेध; कोंबड्या हातात घेऊन आंदोलन