महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Her Ghar Tiranga : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरटीओ कार्यालयाची 'हर घर तिरंगा' रॅली - Rally RTO Office

Her Ghar Tiranga : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनच्या वतीने सकाळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर झेंडा' या उपक्रमाच्या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून वाहनांना रवाना केले.

Her Ghar Tiranga
Her Ghar Tiranga

By

Published : Aug 8, 2022, 1:04 PM IST

सोलापूर - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनच्या वतीने सकाळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर झेंडा' या उपक्रमाच्या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून वाहनांना रवाना केले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंग गव्हारे, मोटार वाहन निरीक्षक प्रदीप बनसोडे, किरण खंदारे, किरण गोंधळे, महेश रायबान, योगेश पांढरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Her Ghar Tiranga

नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी तिरंगा रॅली- 'हर घर तिरंगा' या उपक्रमाची नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर व आरटीओ गायकवाड यांनी सांगितले आहे. जवळपास 50 वाहने 'हर घर तिरंगा' रॅलीत सहभागी झाले आहेत. शहरातील विविध चौकात जाऊन ही वाहने आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा बाबत जनजागृती करत आहेत. तसेच तालुक्यात सुद्धा जनजागृती केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बोलताना दिली.

सोलापुरात हर घर तिरंगाचे वातावरण -सोलापुरातील प्रत्येक शासकीय कार्यालयात आझादी का अमृत महोत्सवासाठी 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन केले जात आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालयात, सोलापुरातील विविध शाळांत आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित केले जात आहे. हर तिरंगा रॅली काढली जात आहे. त्यामधून जनजागृती केली जात आहे.

हेही वाचा -Suspense on BJP JDU alliance in Bihar : बिहारची अवस्था महाराष्ट्रासारखी? नितीश यांनी बोलावली बैठक

हेही वाचा -JEE Main Result Released : जेईई मेन 2022: जेईई मेन 2022 चा निकाल जाहीर, कटऑफ तपासा

ABOUT THE AUTHOR

...view details