सोलापूर- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाला तिसर्यांदा साकडे घातले. तरी देखील विठ्ठल आपल्याला आशीर्वाद देणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राजू शेट्टी यांचे विठ्ठलाला साकडे - Raju Shetty Farmer Problems Pandharpur
आज तिसऱ्यांदा विठ्ठलाला साकडे घातले असून सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना विठ्ठलाला केली आहे. सरकारला जर का सुबुद्धी झाली नाही तर, शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.
महाविकास आघाडीने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, असे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळावे व त्यांना सुबुद्धी मिळावी यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कार्यकर्त्यांसह विठ्ठलाचे दर्शन घेतले व साकडे घातले. यावेळी शेतकरी पूर्ण कर्जमुक्त व्हावा, असे सांगत मागील दोन वेळा विठ्ठलाला साकडे घातले असून तत्कालीन सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या होत्या, अशी आठवण राजू शेट्टी यांनी याप्रसंगी करून दिली. त्याचबरोबर, आज तिसऱ्यांदा विठ्ठलाला साकडे घातले असून सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना विठ्ठलाला केली आहे. सरकारला जर का सुबुद्धी झाली नाही तर, शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.
हेही वाचा-सोलापूर महानगरपालिकेच्या विधान सल्लागाराला ५० हजारांची लाच घेताना अटक