सोलापूर- शहरात रात्रभर पाऊस कोसळत होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे सोलापूर शहरातील भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील मतदान केंद्रात पाणी शिरले आहे.मतदान केंद्रात एक फुटापेक्षा जास्त पाणी साचलेले असून मतदारांना साचलेल्या पाण्यातून मतदान करावे लागत आहे.
सोलापुरातील मतदान केंद्रात मतदारांऐवजी वरुणराजाच बरसला - Solapur north Assembly Election
शहरात रात्रभर पाऊस कोसळत होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे सोलापूर शहरातील भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील मतदान केंद्रात पाणी शिरले आहे.
भवानी पेठेतील मतदान केंद्र
सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये कालपासून पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. अनेक मतदान केंद्रांमध्ये पाणी शिरल्याने मतदारांना मतदानाला जाण्यासाठी त्रास सहन करावे लागत आहे. यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Last Updated : Oct 21, 2019, 10:22 AM IST