महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपुरात पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरस्थिती कायम - पंढरपुरात पुरस्थिती कायम

मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमशान घातलं आहे. पण सोलापूर आणि पंढपुरातल्या पावसाचा जोर काल दुपारपासून काहीसा ओसरला आहे. मात्र अद्याप पूरस्थिती कायम आहे.

Flood situation persists in Pandharpur
पंढरपुरात पूरस्थिती कायम

By

Published : Oct 16, 2020, 10:02 AM IST

पंढरपूर - मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमशान घातलं आहे. सोलापूर आणि पंढपुरातल्या पावसाचा जोर काल दुपारपासून काहीसा ओसरला आहे. मात्र, अद्याप पूरस्थिती कायम आहे. चंद्रभागा नदीचे पाणी पंढरपूर शहरात शिरले असून, चंद्रभागेतील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पंढपुरात येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

आतापर्यंत सुमारे 17 हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर उजनीतून 80 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर वीर धरणातून 20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

पंढरपुरात पूरस्थिती कायम

हेही वाचा-दुकानांसह हॉटेल-बार सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ; मुंबई आयुक्तांनी काढले 'हे' आदेश

उजनी धरणातून विसर्ग कमी असला, तरीसुद्धा मागच्या 48 तासात पावसाचे पाणी ओढे, नाल्यात गेल्याने आणि चंद्रभागेत मिसळत असल्यामुळे चंद्रभागेची पाणी पातळी तेवढीच आहे. त्यामुळे सध्या पंढपुरात नावेमार्फत वाहतूक करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अजूनही पंढपुरात शहरातील रस्त्त्यांना नद्याच्या स्वरुप कायम आहे.

दरम्यान सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. सध्या उजनीतून भीमा नदीपात्रात 80 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. एनडीआरएफ, स्थानिकांच्या मदतीने नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत असून जिल्ह्यातील 500 हून अधिक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

हेही वाचा-ही 'मिलेट बँक' आहे मोठ्या फायद्याची... एकदा पाहाच

ABOUT THE AUTHOR

...view details