सोलापूर -अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापुरात आज दुपारी दमदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी अडीचनंतर संपूर्ण शहरात काहीवेळ जोरदार पाऊस पडत होता. जून आणि जुलै हे दोन्ही महिने पूर्णपणे कोरडे गेल्यानंतर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
सोलापूरात दमदार पावसाला सुरुवात - सोलापूरात पावसाला सुरुवात
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापुरात आज दुपारी दमदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी अडीचनंतर संपूर्ण शहरात काहीवेळ जोरदार पाऊस पडत होता. जून आणि जुलै हे दोन्ही महिने पूर्णपणे कोरडे गेल्यानंतर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
सोलापूरात दमदार पावसाला सुरुवात
यावर्षीच्या पावसाळ्यात सोलापूर शहरातील हा सर्वात जोरदार पाऊस होता. मागील दोन महिन्यात पाऊस न झाल्यामुळे खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. आजच्या पावसामुळे निदान जमिनीत ओलावा टिकून राहील. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी हा पाऊस गरजेचा होता.