सोलापूर- शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी चार वाजता सोलापूर शहरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. आज पडत असलेल्या पावसामुळे सोलापूर शहरात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमावर पावसाचे सावट राहणार आहे.
सोलापुरात रिमझिम.. महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमावर पावसाचे सावट - CM in solapur
आज सोलापुरात आलेल्या पावसाने मुख्यमंत्र्यांच्या नियोजित सभेवर पावसाचे सावट असणार आहे. संपूर्ण राज्यभर दौरा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सोलापुरात आली असून आज या यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
सोलापुरात पावसाची हजेरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा समारोप सोलापुरातील पार्क मैदानावर होत आहे. संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार असून या सभेसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत.