सोलापूर - मुंबई आणि पुण्यादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
बोर घाटातील हे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम चाचणीनंतर ही मार्गिका १५ जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन सुरु आहे. ही माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊस झाला. यामुळे मंकी हिल ते नागनाथ या २ स्थानकांमधील दक्षिण घाट परिसरातील मुंबई दिशेकडील रेल्वे मार्ग वाहून गेला. रेल्वे रुळांखालची खडी, रेती वाहून गेली. त्यामुळे ३ ऑक्टोबरपासून तिसरी मार्गिका पूर्णपणे बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले होते.