महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात ६० हजारांची लाच घेणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्याला अटक - railway officer

खोत यांनी कंत्राटदाराकडे ६० हजारांच्या लाचेची मागणी केली. कंत्राटदाराने 60 हजारांपैकी ३० हजार रुपये पहिला टप्पा म्हणून देऊ केला होता. ३० हजार रुपयांची लाच घेताना ही अटक करण्यात आली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यास घेऊन जातान पोलीस अधिकारी

By

Published : Nov 14, 2019, 2:44 PM IST

सोलापूर- रेल्वे विभागातील रेल्वेतील विभागीय यांत्रिकी अभियंत्याला 60 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सोलापूर रेल्वे विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या दीपक खोत यांनी 30 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

हेही वाचा -शिवसेनेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात; पंढरपुरात 'मदत केंद्र' सुरू

रेल्वेतील साफसफाईचे टेंडर मिळवून देण्यासाठी मदत केली. तसेच, भविष्यात बिल काढण्यासाठी देखील मदत करेन, असे सांगून खोत यांनी कंत्राटदाराकडे 60 हजारांच्या लाचेची मागणी केली. कंत्राटदाराने 60 हजारांपैकी 30 हजार रुपये पहिला टप्पा म्हणून देऊ केला होता. 30 हजार रुपयांची लाच घेताना ही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -उदयनराजेंचे लवकरच पुनर्वसन होईल, खासदार नाईक निंबाळकरांचे संकेत

तक्रारदाराला गूलबर्गा - ते हैद्राबाद या रेल्वे गाड्यातील साफसफाईचे काम मिळाले होते. कंत्राट मिळाल्यानंतर करारपत्र करताना, तसेच वेळोवेळी बिल काढून देण्यासाठी कंत्राटाच्या पूर्ण रकमेवर एक टक्का रक्कम दीपक खोत यांनी मागितली होती. यातील रक्कम स्विकारताना ही अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details