महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुका : सोलापूर पोलिसांचे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे - ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर छापे

ग्राम पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर कारवाईची विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. हद्दीत मुळेगाव तांडा गावाच्या शिवारात हातभटटी दारूच्या अड्ड्यावर कार्यवाही झाली आहे. या करवाईत तांड्यावरील एकुण 14 ठिकाणावर छापे टाकले. यात 14 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातभटटी दारू तयार करण्यासाठी लागणारी सामग्री नष्ट करण्यात आली आहे.

solapur police actions on illegal liquor
सोलापूर मुळेगाव तांड्यावर कारवाई

By

Published : Jan 10, 2021, 6:53 AM IST

सोलापूर - मुळेगाव तांड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आणि पोलीस ठाणे यांनी हातभट्टी धंद्यावर संयुक्त कारवाई केली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

अवैध व्यवसायांवर विशेष मोहीम
सोलापूर ग्रामीण भागातील अवैध व्यवसायांवर कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुळेगाव तांडा गावाच्या शिवारात हातभटटी दारूच्या अड्ड्यावर कारवाई झाली आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस दल विभाग, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त पणे विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे
तांड्यावरील 14 अड्ड्यावर धाडी, 12 लाखांचा मुद्देमाल नष्ट
मुळेगाव तांडा या परिसरात अवैधरित्या हातभटटी दारू तयार करण्यात येत होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी तांड्यावरील एकूण 14 ठिकाणावर छापे टाकले. यात 14 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातभटटी दारू तयार करण्यासाठी लागणारी सामग्री नष्ट करण्यात आली आहे.
सोलापूर मुळेगाव तांड्यावर कारवाई

कारवाईत तीन टीमचे विशेष काम

कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, प्रभाकर शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग हे प्रत्यक्ष सहभागी होते त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील, (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, पो. नि. फुगे, राखीव पोलिस निरिक्षक काजोळकर, सहा.पो.नि बंडगर, बुवा, चौधरी, म सहा. पो.नि. तावरे, पो.स.ई दळवी, इंगळे, पिगुवांले, म.पो.स. गोडबोले तसेच सोलापूर ग्रामीण कडील आर.सी.पी. पथक, क्यु.आर.टी.पथककातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारानी कारवाईत भाग घेतला.

हेही वाचा -राज्यात ३५८१ नवीन रुग्णांचे निदान; ५७ रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details