महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज देण्याचे बँकांना आदेश

अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी बॅंकांनी कर्ज वाटपाबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.

Pandharpur Agriculture News
शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज देण्याचे आदेश

By

Published : Oct 24, 2020, 7:53 PM IST

पंढरपूर - अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी बॅंकांनी कर्जवाटपाबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.

तालुक्यातील रब्बी हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पत पुरवठ्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक पंढरपूरमधील प्रांत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्यासह सहाय्यक व्यवस्थापक एस. एम. तांदळे व तालुक्यातील बँकेचे शाखाधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे पिकांचे व फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. पीककर्ज वाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, तसेच शेतकऱ्यांना सहकार्य करून बँकांनी सुलभपणे व तातडीने पीककर्ज वाटप करावे. कर्जासाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याची बँकांची जबाबदारी आहे, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details