सोलापूर:महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka border dispute) मुद्दा वाढतच चालला आहे. सोमवारी सायंकाळी अक्कलकोट तालुक्यात असलेल्या ग्रामस्थांनी व विविध गावच्या सरपंचांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदन (villagers statement to Collector) दिले आहे. अक्कलकोट तालुक्यातील 28 गावांच्या प्रमुखांनी निवेदन (Villagers Statement To Collector) दिले आहे. भारत स्वातंत्र्य होऊन अनेक वर्षे झाली; पण आजतागायत येथील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित (citizens deprived of basic facilities) आहेत, अशी खंत व्यक्त केली. (Latest news from Solapur) आम्हाला सुविधा द्या (Provide facilities) अन्यथा कर्नाटक राज्यात जाऊ द्या (else let them go to Karnataka) अशी मागणी केली.
Border Dispute : सुविधा द्या अन्यथा कर्नाटकात जाऊ द्या; 28 गावकऱ्यांचे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - गावकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka border dispute) मुद्दा शांत होण्याऐवजी पुन्हा उफाळून येत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली असली तरी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित (citizens deprived of basic facilities) आहेत, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. (Latest news from Solapur) आम्हाला सुविधा द्या (Provide facilities) अन्यथा कर्नाटक राज्यात जाऊ द्या (else let them go to Karnataka) अशी मागणी केली. यासंदर्भात 28 गावकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (Villagers Statement To Collector) दिले आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच :अक्कलकोट तालुक्यात भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी व दक्षिण सोलापूर तालुक्यात सुभाष देशमुख हे भाजपाचे आमदार आहेत. येथील लोकप्रतिनिधी म्हणावे तसे लक्ष देत नाहीत. मूलभूत सुविधा देत नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत नसल्याची माहिती अक्कलकोट तालुक्यातील ग्रामस्थांनी सोलापुरात व्यक्त केली.
महाराष्ट्रकडून भयंकर असे दबाव :कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी यांनी माहिती देताना सांगितले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भाग मागितल्यापासून सीमावर्ती भागात तणाव निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.