सोलापूर - महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर हटावचा नारा देत सोलापूर पालिकेतील शेकडो कर्मचारी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरले होते. सोलापूर महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी पाठिंबा दर्शवला होता. March Against Solapur Municipal Commissioner P Shivshankar आंदोलकांच्या नेत्यांनी निवेदन देऊन आल्यानंतर सदर बाजार पोलीस दलाने आंदोलनाचे नेतृत्व करणारे कामगार नेते अशोक जानराव यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी जबरदस्त विरोध केला. एकनाथ शिंदे समर्थकांनी देखील पोलिसांचा विरोध केला. यावरून पोलिसांसोबत शाब्दिक खडाजंगी झाली. शिंदे गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले मनीष काळजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत पोलीस वाहनांसमोर बसून ठिय्या आंदोलन केले.
आक्रोश मोर्चाला परवानगी नसल्याने कामगार नेत्याला अटकसोलापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त हटाव, आयुक्त पी शिवशंकर यांची बदली करा अशा निषेधार्थ घोषणा देत महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर पायी चालत आक्रोश मोर्चा काढला. या आक्रोश मोर्चाला पोलीस परवानगी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. कामगार नेते अशोक जानराव यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आणि बाहेर येताच पोलिसांनी अटक केले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांचा विरोध केला.