महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राजगृह' तोडफोड प्रकरणाचा सोलापुरात निषेध; आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन - सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाधिकारी निवेदन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. सोलापूरमध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घोषणाबाजी करून तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.

Solapur Agitation
सोलापूर आंदोलन

By

Published : Jul 8, 2020, 2:44 PM IST

सोलापूर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. राज्यभर या घटनेचे पडसाद उमटत आहेत. सोलापूरमध्येही या घटनेचा निषेध करण्यात आला. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घोषणाबाजी करून तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.

आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन तर राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी वंचित बहूजन आघाडी, आरपीआयच्या कार्यकर्तेही सहभागी झाले होते. राजगृहावर तोडफोड करणाऱ्या समाज विघातकांना तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राजगृहावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केली आहे.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत दोषींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि घरांच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत दोषीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details