सोलापूर- ईडीकडून शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांचे नाव आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त असून त्यांनी मिळेल त्या ठिकाणी ईडी आणि भाजपचा निषेध सुरू केला आहे. सोलापुरातही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
सोलापुरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले हेही वाचा - ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे
सोलापुरातही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क गाढवालाच 'ईडी नव्हे, भाजपचा घरगडी' असे पोस्टर चिकटवून सरकारच्या प्रति आपला रोष व्यक्त केला आहे. यावेळी सरकार आणि ईडीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
एकूणच या ईडी आरोप प्रकरणावरून शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकीय दृष्ट्या पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आला आहे.
हेही वाचा - पवारांचे अचूक टायमिंग! ईडीची पीडा राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर?