पंढरपूर - राज्याचे आराध्यदैवत असणारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा 16 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर होणार आहे. या विवाह सोहळ्याची धामधूम आता अंतिम टप्प्यात असून या विवाह सोहळ्यात विठूराया नवरदेव असतो तर रुक्मिणी माता नवरीच्या रूपात असते. या विवाह सोहळ्यासाठी बेंगलोर येथील सविता चौधरी या फॅशन डिझायनर सिल्क कपड्यापासून पोशाख तयार केला आहे. त्याची एक लाख रुपये किंमत आहेत.
विठुराया व मातेच्या विवाह सोहळ्यासाठी सुरेख पोशाख-
वसंत पंचमी च्या मुहूर्तावर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी केली जाते. त्यात विठुराय हा नवरा देव होतो तर रुक्मिणी माता नवरी असते. या विवाह सोहळयासाठी बंगळूर येथील सविता चौधरी या महिला भाविकाने विठ्ठलसाठी धोती, अंगी, पागोटे, उपरणे तर रुक्मिणीसाठी पांढराशुभ्र पोशाख कांचीपुरम सिल्क साडी व चोळी असा बसता तयार केला आहे. मंगळवारी तो बसता कार्यकारी अधिकारी जोशी यांच्याकडे चौधरी यांनी सुपूर्त केला आहे. चौधरी यांना हा पोशाख सिल्क कपड्यापासून तयार करण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागला. विठूराया हा विष्णूचा अवतार म्हणून पाहिला जातो. त्या प्रमाणातच विष्णू देवाच्या रूपातील शंख, चक्र, ओम, असे चित्र असणारे नक्षीकाम कपड्यावर करण्यात आले आहे.