सोलापूर- शहरात आज भल्या सकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा दिला आहे.
सोलापुरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ
सोलापूर शहरात आज भल्या सकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा दिला आहे.
राज्यात मान्सून १४ जूननंतर सक्रिय होणार असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरीही सोलापूर शहर व परिसरात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शहर व परिसरात आज चांगल्या पावसाला सुरुवात झाली.
मात्र, यावेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी वादळी वाऱ्याचा जोर पाहून पावसाचा आनंद घेण्याऐवजी सुरक्षित आसरा शोधणे पसंत केले. रस्त्यावरची वाहने दिवे लावून मार्ग काढत होती तर भाजी विक्रेते, पेपर टाकणारे आणि दूधवाले यांची त्रेधातिरपीट उडाली.