सोलापूर- भंडारा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात झालेल्या आगीच्या घटनेमुळे दहा नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. या घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पितळ उघडकीस आला आहे.
रविवारी (दि. 10 जाने.) सकाळी पंढरपूरमार्गे प्रवीण दरेकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. हेरिटेज मंगल कार्यालयात एक खासगी कार्यक्रम आटोपून त्यांनी अल्प काळ पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भंडारा घटनेवर संताप व्यक्त केला.
राज्य सरकारचा नाकर्तेपणा
भंडारा जिल्ह्यातील घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या घटनेला सरकारचा सर्वस्वी नाकर्तेपणा जबाबदार आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे या दहा नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे, असे दरेकर म्हणाले.
त्या बाळांचे जीव वाचले असते