सोलापूर - लग्नासाठी दिमाखदार मंडप देखील उभाण्यात आला होता. लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भव्य स्वरुपातील लग्नसोहळा रद्द करण्याचा निर्णय जुळे सोलापूर येथील लोंढे परिवाराने घेतला आहे. त्याऐवजी लोंढे आणि गुंंड परिवाराने त्यांचा नियोजित असलेला लग्नसोहळा कौंटुंबिक पातळीवर उरकुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरानामुळे जुळे सोलापूर येथील प्रसादराजे लोंढे यांचा शाही विवाहसोहळा रद्द.... हेही वाचा...कोरोना इफेक्ट : गारगोटीत पार पडला केवळ 20 ते 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा
सोलापूरातील जुळे सोलापूरात राहणारे प्रसादराजे लोंढे यांचा आज (गुरुवार) दिनांक 19 मार्चला विवाह सोहळा होणार होता. या विवाह सोहळ्यासाठी दिमाखदार असा मंडपही उभारण्यात आला होता. प्रसादराजे लोंढे यांची सामाजिक संस्था असून त्या संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत असतात. त्यामुळे लोंढे यांच्या विवाहाला गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोंढे आणि गुंड कुटूंबियांनी आज होणारा शाहीविवाह सोहळा रद्द करुन तो कौटुंबिक पद्धतीने उरकण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा...कोरोना इफेक्ट : अहमदनगरमध्ये २२ इराणी-जपानी नागरिक अडकले
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात आपतकालीन कायदा लागू करण्यात आला आहे. प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. असे असताना नागरिकांकडूनही स्वंयप्रेरणेने काळजी घेतली जात आहे. लोंढे आणि गुंड कूटूंबियांनी रद्द केलेला शाहीविवाह सोहळा हा इतरांना देखील प्रेरणा देणारा आहे. राजेशाही थाटात होणारा हा विवाह सोहळा मूहूर्ताच्या काही तास आगोदर रद्द करण्यात आला असून त्यांनी तो कौंटुबिक पातळीवर उरकणार आहेत. तसेच प्रसादराजे लोंढे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाह सोहळा रद्द झाला असून कोणीही विवाह सोहळ्याला येऊ नये. सर्वांना स्वागत समारंभाचे निमंत्रण दिले जाईल, असे आवाहन केले आहे.