सोलापूर Praniti Shinde On Nandi Dhwaj Puja : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या महा यात्रेला शनिवार पासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्तानं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) नंदीध्वजाच्या पूजेसाठी हिरेहब्बू वाड्यात आले होते. काही दिवसांपूर्वी सोलापुरात हिंदू जन आक्रोश सभा आणि मोर्चा झाला होता. मोर्चावेळी सोलापुरात गोंधळ झाला होता तर. सोलापुरातील सामाजिक वातावरणात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आता खबरदार जर सोलापुरात येऊन कुणी धर्माच्या नावावर लावालावी करत असेल तर, असा आमदार प्रणिती शिंदें यांनी भाजपा नेत्यांना दिला आहे.
मिलिंद देवरा आणि विजय वडेट्टीवार यांच्या बाबत सर्व अफवा : मिलिंद देवरा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय. मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाणार ही एक मोठी अफवा आहे. विरोधक त्यांच्याबाबत नेहमी अफवा पसरवतात. हे जातात ते जातात असं सांगितलं जातं. विरोधकच अशा अफवा उठवतात यात काहीही तथ्य नाही, असा दावाही त्यांनी केला. वड्डेटीवार यांच्याबाबत अशी अफवा पसरली आहे. काँग्रेस पक्षात सर्वांना मान सन्मान दिला जातोय. काँग्रेस हा लोकशाही जिवंत असलेला पक्ष आहे. हा हुकूमशाहीचा पक्ष नाही, हम बोले सो कायदा म्हणणारा, असा कोणता पक्ष आहे हे तुम्हाला माहिती आहे, असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय.