सोलापूर- मोदीजी बाहेर या ! आणि हाथरस प्रकरणात काही तरी बोला अशी टीका करत सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर प्रखर टीका केली. या प्रकरणी मोदींनी काही तरी प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घेतला पाहिजे असे म्हणत त्यांनी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश राज्य सरकार वर टीकास्त्र सोडले. सोमवारी रात्री काँग्रेस भवन येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मोदी बाहेर या! हाथरस प्रकरणात काही तरी बोला- आमदार प्रणिती शिंदे
हाथरस अत्याचार प्रकरणाचा देशातील सर्वच स्तरातुन विरोध होत आहे. ठिकठिकाणी मोर्चे, निर्दशने करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान मोदी याबाबत काहीच बोलत नसुन त्यांनी बाहेर येत काहीतरी बोलले पाहीजे असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
उत्तर प्रदेश येथील हाथरस अत्याचार प्रकरणाच निषेथ करत प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांवर टीका केली. हाथरस प्रकरणाने देशाच्या प्रतिमेला काळा फासला गेले आहे. पीडित मुलीवर जिवंत असताना देखील तिच्यावर अन्याय झाला आणि मरणानंतर देखील अन्याय झाला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झाली झाले पाहिजे. जर त्यांना पाठीशी घातले गेले तर असे कृत्य सर्रास होतील. हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मात्र, मात्र सत्य हे जास्त दिवस लपवून ठेवता येऊ शकत नाही. ते कधी न कधी बाहेर येणारच त्या म्हणाल्या.
हाथरस अत्याचार प्रकरण देशासमोर येताच स्थानिक पोलिसांनी ते दडपण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीच्या मृत्युनंतर तिचे शव घरच्यांना न देता, पोलिसांनी परस्पर अंतिम संस्कार केले. हे सर्व संशयास्पद आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजतागायत एक शब्द ही बोलले नाही. देशभरात विविध ठिकाणी या प्रकरणावर निदर्शने करण्यात येत आहेत. तरी देखील पंतप्रधान मूग गिळून गप्प का आहेत? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रकरणात तपासाची सूत्रे आता सीबीआयने घेतली आहेत. सोलापुरातही वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस पक्ष, आंबेडकरवादी संघटना, महिला संघटना आदींनी या प्रकरणी निदर्शने करून हाथरस प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. रेल्वे रोको आंदोलन केली. तसेच, या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनेही देण्यात आली, अशी माहीतीही त्यांनी दिली.