सोलापूर- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज शहरात हजारो समर्थकांची रॅली काढून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. प्रकाश आंबेडकर यांनी काढलेल्या रॅलीमध्ये हजारो समर्थक सहभागी झाले होते.
प्रचंड शक्ती प्रदर्शनात प्रकाश आंबडेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल - BJP
सालोपुरात लोकसभेसाठी प्रकाश आंबडेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल... काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे समोर राहणार तगडे आव्हान... शिंदेंसह भाजप उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामींनी भरला उमेदवारी अर्ज..
![प्रचंड शक्ती प्रदर्शनात प्रकाश आंबडेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2793182-979-334b9d6f-85b1-41ef-b8c9-c282dbba4d7d.jpg)
प्रकाश आंबडेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रकाश आंबडेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल
सोलापूर लोकसभा मतदार संघ हा बहुचर्चित मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या मतदार संघातून काँग्रेसचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते सुशीलुकमार शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून उमेदवारी अर्ज भरून या मतदार संघात शिंदेंपुढे कडवे आव्हान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे भाजपने जयसिद्धेश्वर स्वामी यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी तिरंगी लढत जास्त चुरशीची होणार आहे.