महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करमाळ्यात प्रहार संघटनेच्यावतीने अर्धदफन आंदोलन - अर्धदफन आंदोलन बातमी सोलापूर

करमाळा तालुक्यातील सालसे ते कुर्डुवाडी या राज्यमहामार्गावर होत असलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून सदर कामामध्ये अतिशय हलक्या प्रतीचा मातीयुक्त मुरुम वापरला जात आहे. सदर मुरुमामध्ये मोठ-मोठे दगड गाडून कसेतरी काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

करमाळ्यात प्रहार संघटनेच्या वतीने अर्धदफन आंदोलन

By

Published : Nov 25, 2019, 1:41 PM IST

सोलापूर-करमाळा तालुक्यातील सालसे ते कुर्डुवाडी या गावादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे. ते चांगल्या प्रतीचे व्हावे या मागणीसाठी रोपळे येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष इंद्रजित आदलिंगे यांच्यावतीने अर्धदफन (स्वतःला जमिनीत गाडून) आंदोलन करण्यात आले.

करमाळ्यात प्रहार संघटनेच्या वतीने अर्धदफन आंदोलन

हेही वाचा-अजित पवार दिशाभूल करत आहेत; भाजपसोबत आघाडीचा प्रश्नच नाही, शरद पवारांचा पलटवार

करमाळा तालुक्यातील सालसे ते कुर्डुवाडी या राज्यमहामार्गावर होत असलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून सदर कामामध्ये अतिशय हलक्या प्रतीचा मातीयुक्त मुरुम वापरला जात आहे. सदर मुरुमामध्ये मोठ-मोठे दगड गाडून कसेतरी काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या गावादरम्यान अद्यापपर्यंत झालेले पुलाचे व इतर कामे ही देखील हलक्या प्रतीचे सिमेंट, तसेच स्टील न वापरता निकृष्ट पद्धतीनेच पूर्णत्वाकडे नेलेले आहे, असा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. त्यामुळे संबधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेच्यावतीने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details