महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रहारच्या कार्यकर्त्यांची 'सायकलवारी'; बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळावे म्हणून विठ्ठलाला साकडे - पंढरपूर विठ्ठल साकडे

आज (सोमवार) महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात मंत्रिपदाची माळ कोणत्या आमदाराच्या गळ्यात पडणार हे दुपारी स्पष्ट होईल. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्याची मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

prahar activist cycling
प्रहारच्या कार्यकर्त्यांची 'सायकलवारी'

By

Published : Dec 30, 2019, 9:02 AM IST

सोलापूर- प्रहार संघटनेचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळावे यासाठी अकोले मंद्रूप येथील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी 80 किलोमीटर 'सायकलवारी' करत पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले आहे.

बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळावे यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांची सायकलवारी

हेही वाचा -आज मंत्रिमंडळाचा विस्तार, राष्ट्रवादीच्या 'या' पाच नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

दरम्यान, आज (सोमवार) महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात मंत्रिपदाची माळ कोणत्या आमदाराच्या गळ्यात पडणार हे दुपारी स्पष्ट होईल. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्याची मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते समर्थ गुंड व गणेश पाटील यांनी चक्क 80 किलोमीटरचा सायकल प्रवास करून विठ्ठलाला साकडे घातले. या दोन कार्यकर्त्यांनी सायकलवरून प्रवास करून आज(सोमवार) पहाटे विठ्ठलाचे दर्शन घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details