महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मोदीजी हेच का ते आपले अच्छे दिन' - प्रहार संघटना - माढा, सोलापूर लेटेस्ट

केंद्र सरकारने लवकरात लवकर तूर, मूग, उडीद आयात करणे थांबवावे, अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे माढा जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी दिला आहे. केंद्र शासनाच्या विरोधात माढा वैराग मार्गावर उंदरगावात थाळी नाद आंदोलन करण्यात आले.

प्रहार संघटनेचे थाली बजाओ आंदोलन
प्रहार संघटनेचे थाली बजाओ आंदोलन

By

Published : May 21, 2021, 11:43 AM IST

सोलापुर- माढा तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी थाळी बजाव आंदोलन करण्यात आले आहे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के, जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

प्रहार संघटनेचे आंदोलन

'मोदीजी हेच का ते आपले अच्छे दिन'

संघटनेचे अध्यक्ष तथा मंत्री बच्चु कडु यांच्या आदेशानुसार राज्यभरात कडधान्याची आयात थांबवण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन उंदरगावातही आंदोलन झाले. तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवून शेतकऱ्यांची अडचण दुर करावी. विविध संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. डिझेल दरवाढी नंतर खताच्या दरात केंद्राने २० टक्याने वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधीक भरच पडत आहे. त्यामुळे 'मोदीजी हेच का ते आपले अच्छे दिन' अशी घोषणाबाजी करण्यात आली.

अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन करु

४२ लाख टन तूरीची भारताला गरज असताना आपल्याकडे ४५ लाख टन तूर सध्या उपलब्ध आहे. एकूण आवश्यकते पेक्षा २ लाख टन तूर अतिरिक्त उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तूर आयात केली आहे. ती नेमकी कशासाठी केली? असा सवाल शेतकरी व सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. तूर, मूग, उडीद आयात पूर्णपणे खुली करून धान्याचे भाव पाडण्याचे केंद्र सरकारचे धोरण दिसत आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर तूर, मूग, उडीद आयात कर थांबवावा, अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी दिला आहे. यावेळी माढा पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे, सचिव मयुर चव्हाण, संदीप चव्हाण, अनिकेत साळुंके, किरण लवटे, धीरज भांगे, संतोष कोळी, संभाजी भांगे आदीसह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान; एक तास चकमक

ABOUT THE AUTHOR

...view details