महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक पारदर्शकतेसाठी अक्कलकोटच्या तहसीलदाराची बदली करा - प्रहार संघटना - तहसीलदार अंजली मरोड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या.  या बदल्या होत असताना अंजली मरोड या अक्कलकोट येथील तहसीलदार आहेत. मात्र, त्यांची बदली झालेली नाही. अंजली मूळच्या बार्शी तालुक्यातील वैराग येथील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांची बदली होणे अपेक्षित होते. मात्र, अंजली यांनी त्यांचे स्वग्राम हे बीड जिल्ह्यातील दारू तालुक्यात दाखविले आहे. त्यामुळे त्यांची बदली झाली नाही.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

By

Published : Mar 9, 2019, 11:19 AM IST

सोलापूर -लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची स्वतःच्या जिल्ह्यातून बदली करण्यात आलेली आहे. मात्र, अंजली मरोड यांचे मुळगाव बार्शी तालुक्यातील असून त्यांनी स्वग्राम बीड जिल्ह्यात दाखवले असल्याचा आरोप प्रहार शेतकरी संघटनेचे राजू चव्हाण यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या. या बदल्या होत असताना अंजली मरोड या अक्कलकोट येथील तहसीलदार आहेत. मात्र, त्यांची बदली झालेली नाही. अंजली मूळच्या बार्शी तालुक्यातील वैराग येथील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांची बदली होणे अपेक्षित होते. मात्र, अंजली यांनी त्यांचे स्वग्राम हे बीड जिल्ह्यातील दारू तालुक्यात दाखविले आहे. त्यामुळे त्यांची बदली झाली नाही. नोकरीत लागल्यानंतर स्वग्राम बदलण्यासाठी शासनाचे काही नियम आहेत.

अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांनी स्वग्राम बदलल्यामुळे त्यांची बदली झाली नाही. तहसीलदार अंजली या अक्कलकोट तालुक्यात आल्यापासून वादग्रस्त राहिल्या आहेत. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील झालेले असल्याचा आरोप राजू चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन तहसीलदार अंजली मरोड यांची बदली करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details