सोलापूर - मोहोळ तालुक्यातील लांबोटीमध्ये उजनीच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले.
सोलापुरातील लांबोटीमध्ये जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने उजनीच्या पाण्याचे पूजन - lamboti
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले.
गेली चार ते पाच वर्षे या भागातील लांबोटी गावात पाणी सोडले जात नव्हते. त्यासाठी देशमूख यांनी भीमा पाटबंधाऱ्याचे शाखा अभियंता लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली. त्याची तात्काळ दखल घेऊन उपकार्यकारी अभियंता यांनी २ दिवसात पाणी सीना नदीत कॅनॉल द्वारे सोडले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. यावेळी पाणीपूजन करण्यात आले. जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, लांबोटीचे सरपंच पप्पू कदम, अर्जुनसोंडचे माजी सरपंच शुक्राचार्य हावळे, युवक अध्यक्ष नाना मोरे, प्रसिद्ध उद्योगपती कुबेर बापू वाघमोडे आदी ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.