महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या हातून 'हुकमी एक्का' निसटला?

मोची आणि मुस्लीम समाजाने आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. आमचा समाज मोठा तर आमदारही आमचाच हवा, अशी मागणी या दोन्ही समाजांनी केली आहे.

प्रणिती शिंदे

By

Published : Jul 30, 2019, 7:57 AM IST

सोलापूर - शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पारंपरिक मतदार म्हणून ज्या समुदायाला ओळखले जाते, त्या मोची आणि मुस्लीम समाजाने आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. आमचा समाज मोठा तर आमदारही आमचाच हवा, अशी मागणी या दोन्ही समाजांनी केली आहे.

काँग्रेसच्या आ.प्रणिती शिंदे यांच्या हाताचा हुकमी एका निसटला?

पाठीमागच्या दोन्ही विधानसभा निवडणुका या मोची आणि मुस्लीम मतदारांच्या बळावर आमदार प्रणिती शिंदे यांनी खेचून आणल्या. त्यात त्यांनी कॉम्रेड नरसय्या आडम यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव केला. प्रणिती यांच्या शहर मध्य मतदारसंघामध्ये मोची मतदार हा 40 हजार तर मुस्लीम 85 हजार आहे. ही सर्व निर्णायक मते आतापर्यंत प्रणिती यांच्या पारड्यात पडत होती. पण आता बदलत्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बंड करत काँग्रेसकडे आपल्याच समाजाला उमेदवारी मिळायला हवी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे समर्थकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

काँग्रेस कमिटीत शरद रणपिसे यांच्यासमोर इच्छुकांच्या मुलाखतीसाठी आलेल्या प्रणिती शिंदे यांनी सावरा-सावर करताना त्या दोन्ही समाजांचा आपल्यालाच पाठिंबा असून आपण सोलापूर शहर मध्य मधूनच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका अर्थाने आमदार प्रणिती शिंदे यांच्या हातातला हुकमी मतदारांचा 'एक्का' निसटला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details