महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आषाढी यात्राकाळात पंढरीत आठ दिवसांच्या संचारबंदीचा प्रस्ताव - Pandharpur curfew news

आषाढी यात्राकाळात पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱयांकडे पाठवला आहे.

pandharpur
panपंढरपूर संचारबंदीdharpur

By

Published : Jun 22, 2021, 7:58 PM IST

Updated : Jun 22, 2021, 10:31 PM IST

पंढरपूर - पांडुरंगाच्या आषाढी वारी कालावधीत पंढरपूर शहर व आसपासच्या गावांमध्ये आठ दिवसाच्या संचारबंदीचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आला आहे. 17 जुलै ते 25 जुलै दरम्यानचा संचारबंदीचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आषाढी यात्राकाळात त्रिस्तरीय स्तरावर नाकाबंदी ठेवली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी दिली आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते
  • आषाढी वारी सोहळ्यात 8 दिवसांची संचारबंदी?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी एकादशी सोहळा प्राथमिक स्वरूपाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला नियमावलीही तयार करून देण्यात आली आहे. त्यामुळे वारी सोहळ्यात लोकांची गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर शहर व आसपासच्या गावांमध्ये 17 एप्रिल ते 24 जुलैपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्या काळात पंढरपूर शहरात 144 कलम लागू असणार आहे.

  • पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी असणार -

राज्य सरकारकडून 10 मानाच्या पालख्यांना एसटी बसच्या माध्यमातून वाखरी येथे आणले जाणार आहे. त्यानंतर वाखरी ते पंढरपूर साडेचारशे महाराज मंडळी व वारकरी प्रतिनिधींना पायी चालण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तर पोलीस प्रशासनाकडून पंढरपुरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग व चंद्रभागा वाळवंटी येथे कोणत्याही भाविक व वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी एकादशी सोहळ्याला पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 22, 2021, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details