भारत बंद आंदोलन; माजी आमदार आडम मास्तरांसह शेकडो कार्यकर्ते ताब्यात - bharat-bandh protest latest news
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सोलापुरात कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा काढण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. आज शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता
सोलापूर- सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण, कृषी कायद्यांना विरोध आदी मागण्यासाठी आज (शुक्रवारी) संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण मोदी सरकार किंवा केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या माकप व सिटूच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालसमोर जमा होताच ताब्यात घेण्यात आले. यात माजी आमदार नरसय्या आडम मास्तर याचाही सामावेश आहे. आंदोलन करू न दिल्याने आंदोलकांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत ही हुकूमशाही चालणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण पोलिसांनी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी होऊ दिली नाही.