सोलापूर- बार्शी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विकास माने यांची कन्या सायली हीचा गुरुवारी (दि. 2 एप्रिल) वाढदिवस होता. तिने कोरोनामुळे वाढदिवस साजरा न करता पोलीस आणि डॉक्टरांना सहकार्य करण्याचा संदेश दिला आहे.
पोलिसाच्या मुलीने दिला वाढदिनी सर्वांना 'हा' संदेश - सायली
बार्शी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विकास माने यांची कन्या सायली हीने घरात रहा, सुरक्षित रहा, हात धुत रहा, असे आवाहन नागरिकांना वाढदिना दिवशी दिली.
कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे पोलीस दल रस्त्यावर आपले कर्तव्य पार पाडत आहेत तर वैद्यकीय कर्मचारीही कोरोनाग्रस्तांचा इलाज करत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करा. घराबाहेर पडू नका. 20 सेकंदापर्यंत स्वच्छ हात धुवा. घरात राहून सुरक्षित रहा, असे आवाहन तिने वाढदिवशी सर्वांना केले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोलापूर अधिक्षक कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा -जिल्ह्यातील गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करा; पालकमंत्री जितेंद्र आव्हाडांची आढावा बैठकीत सूचना