पंढरपूर - शहरात अवैधरित्या सावकारी करणाऱ्या भाजप युवा मोर्चाचे पंढरपूर शहराध्यक्ष विदुल पांडुरंग अधटराव याच्याविरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर शहर पोलिसांकडून अधटराव यांच्या घरावर छापे मारून 48 चेक बुक, 9 हिशोब वह्या, चेक बुक व पासबुक यांच्यासह रोख 30 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विदुर अधटराव याच्याविरोधात खाजगी सावकारीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत त्यांच्या पथकाने विदुर अधटराव यांच्या घराची झडती घेतली. यावेळी 48 चेक, 9 हिशोबाच्या वह्या, कोरा स्टॅम्प, चेक बुक, पासबुक यांसह तीस हजार रुपये असा दस्तऐवजसह रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत. सहाय्यक निबंधक अधिकारी प्रदीप सावंत यांच्या समक्ष तपासणी करून दस्ताऐवज व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्षाविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल - illegal money lending case against BJP leader
भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विदुर अधटराव याच्याविरोधात खाजगी सावकारीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत त्यांच्या पथकाने विदुर अधटराव यांच्या घराची झडती घेतली
![भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्षाविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल BJP leader Vidul Adhatrao](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10895682-235-10895682-1615028483921.jpg)
हेही वाचा-हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने निर्माण झाले अनेक नवे प्रश्न, अंबानींना धमकी प्रकरणाला कलाटणी
खासगी सावकारकीचे अनेक गुन्हे दाखल होण्याची शक्यता...
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल झाले आहेत. त्यामुळे खाजगी सावकार व त्याचे साथीदार यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. खासगी सावकारकीचे प्रकार शहरांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे सावकारकीचे अनेक गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून कर्जदाराची जमीन, जागा, वाहने, अवैधरित्या गहाण ठेवून दंडव्याज करणाऱ्या सावकाराविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा-सचिन वझेंच्या नियुक्तीवर मनसेकडून संशय