सोलापूर - शहरात 10 दिवसांच्या संचारबंदीला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासून संचारबंदी सुरू झाली असून शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात दूधवाले आणि पोलीस वगळता इतर कोणीही रस्त्यावर दिसले नाही. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी सोलापुरातील रस्त्यांवर पूर्ण शुकशुकाट होता.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापूरात 10 दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 16 जूलै मध्यरात्रीपासून सुरू झालेली संचारबंदी 26 जूलै मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. शहरातील दुकाने आणि बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या असून पूढील 10 दिवस शहरातील एकही दुकान उघडले जाणार नाही. सोलापूरकरांनी घराबाहेर पडू नये असे, आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.