सोलापूर- करमाळा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या करमाळा व केतूर नंबर २ येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा पोलिसांनी गावातील प्रमुख रस्त्यावरून संचलन केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात पोलिसांचे पथसंचलन - solapur Assembly elections
करमाळा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या करमाळा व केतूर नंबर २ येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा पोलिसांनी गावातील प्रमुख रस्त्यावरून पोलिसांच्या वतीने संचलन करण्यात आले.
पथसंचलन करताना पोलीस
२१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होत असल्याने या निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. निवडणूक शांततेच्या व भीतीमुक्त वातावरणात पार पाडली जावी यासाठी हे संचलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या संचलनात केंद्रीय पोलीस, अर्धसैनिक बलातील सशस्त्र जवान सहभागी झाली होते. तालुक्यातील संवेदनशील गावात हे पथसंचलन करण्यात आले.
हेही वाचा - 'त्या' वक्तव्याबद्दल राऊतांविरोधात बार्शीत मूक मोर्चा