महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Constable Suicide :  पोलीस कॉन्स्टेबलची राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या, आत्महत्येचे कारण काय? - सोलापूर पोलीस कॉन्स्टेबल आत्महत्या

Police Constable Suicide सोलापुरातील एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी रायफलीमधून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल शिरसट असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

Police Constable Suicide in Solapur
Police Constable Suicide in Solapur

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 12:19 PM IST

सोलापूरPolice Constable Suicide :पोलिसांना सामोरे जावे लागणाऱ्या ताण-तणावाची समस्या पुन्हा चर्चेत आली आहे. सोलापूर पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राहुल शिरसट यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे सोलापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांत दोन पोलिसांनी सोलापुरात राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केल्या आहेत.


सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने केशव नगर पोलीस वसाहतीत रायफलनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून राहुल शिरसट यांना मृत घोषित केले आहे.

राहुल शिरसट

हनुवटीवर रायफल ठेवून ट्रिगर दाबला-राहुल यांच्याकडे नेहमीची एसएलआर रायफल होती. ड्युटी संपल्यानंतर राहुल हे एसएलआर रायफल कार्यालयात जमा करत होते. बुधवारी सकाळी ड्युटी संपल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यानं रायफल जमा केली नाही. ते रायफल घरी घेऊन गेले. केशव नगर पोलीस वसाहतीत त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. यावेळी रायफलच्या आवाजानं केशव मगर पोलीस वसाहत हादरली.


राहुल मुंबई पोलीस दलात भरती झाले होते-राहुल शिरसट हे 2011 साली मुंबई पोलीस दलात भरती झाला होते. 2017 साली सोलापूर शहर पोलीस दलात त्यांची बदली झाली होती. सोलापूर शहर पोलीस दलात बदली होऊन आल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली होती. प्रशासकीय कारणास्तव राहुल यांची बदली मुख्यालयात झाली होती. ते पोलीस आयुक्त यांच्या बंगल्यावर अनेक महिन्यांपासून राहुल सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होते.राहुल याचे वडील सोलापूर पोलीस दलात अनेक वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत.

  • नैराश्यावस्था असेल तर तज्ज्ञांचा घ्यावा सल्ला-जेव्हा नैराश्याची किंवा ताण-तणावाची समस्या असेल तेव्हा मित्र-नातेवाईकांशी चर्चा करावी, असा तज्ज्ञ सल्ला देतात. ताण-तणाव किंवा इतर कोणत्याही कारणानं आत्महत्या करणं हा पर्याय नसतो. नैराश्यात असलेल्या व्यक्तीनं समुपदेशकांचा सल्ला घेणं योग्य असते.

हेही वाचा-

  1. Maratha Reservation Suicide : मराठा आरक्षणासाठी तब्बल 'इतक्या' आत्महत्या; मराठवड्यात प्रमाण जास्त
  2. suicide cases : ऐन दिवाळीत नापिकी कर्जबाजारीपणामुळं शेतकऱ्याची आत्महत्या; शेतातच संपवलं जीवन

ABOUT THE AUTHOR

...view details