सांगोला (सोलापूर) -दारू विक्रीचा आरोप करत सांगोला पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांनी मारहाण करून पैशाची मागणी केल्याचा प्रकार सांगोला तालुक्यातील सावे गावात घडला आहे. संदेश शिकतोडे आणि आवताडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून पांडुरंग शेळके, निलेश माने, सौरभ माने (रा. सावे) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मारहाण झालेल्या तिघांनी सांगोला पोलीस प्रमुखांना ऑनलाईन तक्रार करून दोन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
सांगोल्यात पोलिसांनी मारहाण करून केली पैशाची मागणी, पोलिसांच्या निलंबनाची वरिष्ठांकडे तक्रार
सांगोला पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी संदेश शिकतोडे आणि अवताडे यांनी तुम्ही दारू विक्री करत आहे, असे सांगून तक्रारदारांच्या घराची झाडाझडती घेऊन कुटुूंबातील महिला व मुलांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली.
पांडुरंग शेळके, सौरभ माने, निलेश माने, हे तिघेही सावे गावचे रहिवाशी असून 25 मे ला सांगोला पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी संदेश शिकतोडे आणि अवताडे यांनी तुम्ही दारू विक्री करत आहे, असे सांगून तक्रारदारांच्या घराची झाडाझडती घेऊन कुटुूंबातील महिला व मुलांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. मी उपसंरपंच असून जाणिवपूर्वक माझी बदनामी केली जात आहे. तसेच माझे मित्र निलेश माने आणि सौरभ शेळके यांनाही मारहाण केल्याचे शेळके म्हणाले. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली, असा आरोप शेळके यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यावर कोणीही बोलण्यास तयार नाही.