पंढरपूर (सोलापूर) -माळशिरस तालुक्यातील मेडद गावात बैलगाडीची शर्यत लावणाऱ्या आठ जणांविरोधात माळशिरस पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मोटरसायकल, बैल जोड्या करता आलेली पिकअप, पैज लावण्या करता आलेले लोकांच्या मोटरसायकली असा एकूण 31 लाख 3 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माळशिरस पोलिसांची कारवाई
माळशिरस पोलीस निरीक्षक दीपक रत्न गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार मेडद या गावाच्या शिवारात 52 फाटा लगत असलेले माळरानावर विविध भागातील आलेले बैलगाड्यांच्या शर्यती आहेत. यासाठी माळशिरस पोलिसांकडून पथक तयार केले गेले. पोलीस आल्याची चाहूल लागताच या ठिकाणी असणारे शर्यत भरवणारे लोक बैलगाडी, मोटरसायकली यांच्यासह सैरावैरा पळून जाण्याचा प्रयत्न केले. शिवाय बैलजोड्या घेऊन उसाच्या शिवारात लपले. पोलिसांनी शोध घेत आरोपींना अटक केली आहे.