सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेला सुरुवात झाली आहे. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या सभेसाठी ही सभा आयोजीत करण्यात आली आहे.
शरद पवारांना हवेचा अचूक अंदाज, त्यामुळेच निवडणुकीच्या मैदानातून काढला पळ - नरेंद्र मोदी - akluj
माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मोदींना राम-राम मंडळी म्हणत साद घातली. विजयसिंह मोहीते पाटलांचे मोदींनी स्वागत केले.
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी म्हणाले..
- शरद पवारांनी हवा ओळखली, मैदान सोडून पळाले.
- मजबूत भारत हवा की मजबूर भारत
- भारताला आम्हीच मजबूत करु शकतो
- आम्ही देशाची नीती बदलली
- साडेतीन लाख बनावट कंपन्या बंद केल्या
- विरोधकांकडे फक्त मोदीला हटवण्याचा मुद्दा, भारतासाठी कोणताही विचार नाही
- मला काँग्रेसचे नामदार शिव्या देतात
- मी मागास असल्याने माझ्या समोर अडचणी आणत आहेत
- पुर्ण मागास समाजाला विरोधक शिव्या देत आहेत
- दलित, शोषित, आदीवासींना चोर म्हणल्यास देश सहन करणार नाही
- शिव्यांची पर्वा न करता गरिबांसाठी प्रयत्न करतोय
- शरद पवारांनी माझ्या कुटुंबावर टीका केली
- पवारांना कुटुंबाच महत्व कसं कळणार
- शरद पवार तुम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकायला हवं होत
- शरद पवारांना शेतकऱ्यांची पर्वा नाही, त्यांनी साखरेची दुकाने चालवली
- पाण्यासाठी जलशक्ती मंत्रालय बणवणार
- समुद्राचे पाणी स्वच्छ करुन गरजेच्या ठिकाणी पाणी देणार
- पाण्याचा वापर राजकारणासाठी करु नका
- कलावंत, पत्रकार, शेतकरी दुकानदार, व्यापारी, विद्यार्थी सर्वच चौकीदार असा दिला नारा
- आता दिल्लीला कळेल हवा कुठे जातेय
Last Updated : Apr 17, 2019, 7:15 PM IST