महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईडीची वाट न बघता सीडी लावा; देवेंद्र फडणवीसांचे खडसेंना प्रत्युत्तर - एकनाथ खडसे

त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन, या एकनाथ खडसे यांच्या या व्यक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

play the cd without waiting for the ed said devendra fadnavis in solapur
ईडीची वाट न बघता सीडी लावा; देवेंद्र फडणवीसांचे खडसेंना प्रत्युत्तर

By

Published : Nov 24, 2020, 4:10 PM IST

सोलापूर- भाजपाने ईडी चौकशी लावली, तर मी सीडी लावेन, असा टोला भाजपाचे बंडखोर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लावला होता. त्यावर ईडीची वाट न बघता सीडी लावा, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तक्रार आल्यानंतरच ईडी कारवाई करते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध आलेल्या तक्रारीत तथ्य आढल्यानंतरच ईडीने कारवाई केली असेल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

विजेच्या कारभाराची वीस वर्षांची चौकशी लावा-

भाजपाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात वीजबिलांची वसुली थकल्यामुळेच आज सरकारला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना पाच काय वीस वर्षांची चौकशी लावा, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवी यांची प्रतिक्रिया

भाजपावर टीका हाच करणे हाच संजय राऊतांचा एक कलमी कार्यक्रम -

महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र, त्यांना किंवा त्यांच्या भावाला मंत्रीपद देण्यात आले नाही. कोणत्याही महत्त्वाच्या बैठकांना संजय राऊत हजर नसतात. भाजपावर टीका करणे, हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, असा टोला ही फडणवीस यांना लगावला. राऊत यांना भाजपावर टीका करण्यापलीकडे दुसरे कोणतेही काम नाही, असेही ते म्हणाले.

प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करावा-

पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक या सार्वत्रिक निवडणूक नसून, कार्यकर्त्यांनी दिलेल्या यादीनुसार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचावे, अशी सूचना फडणवीस यांनी भाजपाच्या आढावा बैठकीत केली.

हेही वाचा- अमेरिकेत ११ डिसेंबरपासून कोरोना लसीकरण सुरू होण्याची शक्यता; 'फायझर'चा पुढाकार

ABOUT THE AUTHOR

...view details