सोलापूर-सोलापूर महापालिकेच्या वतीने'माझी वसुंधरा' अभियान अंतर्गत शहरात वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील 52 ठिकाणी यावेळी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
'माझी वसुंधरा' अभियान अंतर्गत सोलापुरात वृक्षारोपण - 'माझी वसुंधरा अभियान' सोलापूर
सोलापूर महापालिकेच्या वतीने 'माझी वसुंधरा' अभियान अंतर्गत शहरात वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील 52 ठिकाणी यावेळी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
'माझी वसुंधरा' अभियान अंतर्गत सोलापुरात वृक्षारोपण
शहरातील राजेश कुमार नगर, मीना नगर, होटगी रोड, या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण कमी करण्यासाठी हे वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. तसेच शहरातील नागरिकांनी वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.