सोलापूरPitbull Dog Attack Solapur: सोलापूर शहरामध्ये शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पूर्व भागातील एका वसाहतीत पिटबुल प्रजातीच्या पाळीव कुत्र्याने एका तरुणावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेला तरुण वाचेल की नाही याची शंका आहे. सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यावर उपचार सुरू आहेत.
कुत्र्याचा जीवघेण्या हल्ल्यावर समाजसेवकाची प्रतिक्रिया कुत्र्याने तोडले लचके:पिटबुल कुत्र्याने अक्षरशः जीवघेणा हल्ला केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणाला कुत्रा फरफटत घेऊन जाताना सपशेल दिसत आहे. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर भयंकर असा वायरल झाला आहे. अंगावर शहारे आणण्यासारखा हल्ला किंवा एका जंगली व हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याप्रमाणे पिटबुल कुत्रा हल्ला करतानाच व्हिडीओ समोर आला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेला असिफ मुल्ला हा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती दिली गेली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद प्रक्रिया सुरू आहे.
कुत्र्याच्या भयंकर हल्ल्याने सोलापूरकर हळहळले:सोलापूर शहरातील एमआयडीसी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पूर्व भागात असलेल्या लक्ष्मीनारायण चित्रपटगृहा जवळील एका उद्योजकाच्या घरी पिटबुल जातीचे दोन कुत्रे आहेत. घराच्या आतील भागात या तरुणावर कुत्र्याने हल्ला केला. तरुणाचं मुंडकं कुत्र्याने जबड्यात धरून त्याला फरफटत घेऊन जातानाच व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पिटबुलच्या हल्लाचे थरारक दृष्य:घरात पाळलेला कुत्रा असा जीवघेणा होऊ शकतो हे सोलापूरकर पहिल्यांदाच पाहिले आहे. दोन कुत्रे एका तरुणाला जबड्यात धरून त्याच्या चिंध्या करताना नागरिकांच्या लक्षात आले. घटना ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. कंपाऊंडच्या आतमध्ये दोन कुत्रे होते. त्यातील पिटबुल कुत्र्याने तरुणावर हल्ला केला. गेट बंद असल्याने लोक आत जाऊ शकले नव्हते. गेटच्या बाहेर जमलेले लोक आरडाओरडा करत होते. दगड आणि लाकडाने मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पिटबुल त्या व्यक्तीला सोडत नव्हता. कुत्र्याचा हल्ला इतका जबरदस्त केला होता की त्याने तरुणाच्या अंगावरील पूर्ण कपडे फाडून टाकले आणि त्याला पूर्णत: नग्न केले. ही घटना अंगावर काटे आणणारी होती.
हेही वाचा:
- Pit Bull Dog Attack Punjab: पिटबूल कुत्र्याने पाच गावात रात्रभर घातला धुमाकूळ; 12 जणांचे तोडले लचके
- Pitbull Dog Attack: पिटबूल कुत्र्याने पकडला तरुणाचा प्रायव्हेट पार्ट; जखमीची प्रकृती चिंताजनक
- Terror Of Dogs : दिल्लीत भटक्या कुत्र्यांनी घेतला दोन सख्या भावांचा जीव! नागरिकांमध्ये दहशत